एकीकडे राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असतानाच,दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनाही बाप्पा पावला आहे. कारण शिंदे सरकारने राज्यातील सुमारे 19 लाख शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ज्यात मराठवाडा विभागाला 1 हजार 8 कोटींची भरपाई मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत नुकसानभरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
#QueenElizabeth2 #England #India #GanpatiVisarjan #EknathShinde #lalbaug #HWNews